ऊन वारा पावसातील कष्टकऱ्यांचा साताऱ्यात झाला सन्मान

News Paper vendors along with dignitaries
News Paper vendors along with dignitaries

सातारा ः नागरिकांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी थंडी, ऊन, वारा व पाऊस अशा कशाचीच पर्वा न करता भल्या सकाळी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र पोचविण्याचे पवित्र कार्य निष्ठेने करणाऱ्या ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करत आज जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 
येथील साईदत्त मंगल कार्यालयात (वाढे फाटा) जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने हा ज्येष्ठ विक्रेत्यांचा सत्कार आयोजित केला होता. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून "सकाळ'चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, सामाजिक कार्यकर्ते अस्लम तडसरकर उपस्थित होते. "सकाळ'चे वितरण व्यवस्थापक तानाजी गायकवाड, तरुण भारतचे वितरणप्रमुख प्रकाश सामंत, लोकसत्ताचे सर्जेराव कातिवले यांचीही उपस्थिती होती. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी विद्यार्थिदशेत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी वृत्तपत्र विक्रीचे काम केले होते. त्यांचा जन्मदिन हा वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो.

त्यानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात गेली कित्येक वर्षे वृत्तपत्र विक्रेता म्हणून निष्ठेने कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते मुन्नाभाई खान (सातारा), दयाराम वाघमारे (शेंद्रे), अशोक राऊत (सातारा), विलास तळेकर (काशीळ), प्रकाश शिंदे (सातारा) यांचा श्री. सोळसकर आणि अस्लम तडसरकर यांच्या हस्ते सत्कार केला.

दोघांनीही सर्व विक्रेत्यांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी डॉ. कलाम, तसेच राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष (कै.) जगन्नाथ कोठेकर यांना अभिवादन केले. कार्यक्रमास सातारा वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र माळी, उपाध्यक्ष ताजुद्दीन आगा, सचिव सावळाराम जंगम, ज्येष्ठ वृत्तपत्रे विक्रेते दिलीप लिपारे आणि जिल्ह्याच्या विविध विभागांतील वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com