esakal | नाईट कर्फ्यू असल्याने 9 च्या आत विसर्जन करा, पोलिसांची सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati-Visarjan

नाईट कर्फ्यू असल्याने 9 च्या आत विसर्जन करा, पोलिसांची सूचना

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव - गणेश विसर्जन करण्यासाठी मंडळांनी विसर्जन तलावांवर गर्दी करू नये तसेच प्रत्येक मंडळाच्या 10 कार्यकर्त्यांनी विसर्जन तलावांवर येऊन रात्री नऊच्या आत श्री मूर्तींचे विसर्जन करावे अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी मंडळांना केले आहे. तसेच गणेश विसर्जना दिवशी शहरात गर्दी होऊ नये यासाठी शहराच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात येणार आहेत अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. तसेच विसर्जनावेळी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नसून नाईट कर्फ्यू लागू असल्याने दिवसा विसर्जन करावे अशा सूचनाही बैठकीत करण्यात आल्या आहेत.

शहरात रविवारी अनंत चतुर्दशीदिवशी मोठ्या प्रमाणात श्री मूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी मार्केट पोलीस स्थानकात बुधवारी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी पोलिस अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी खडे बाजार पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्राप्पा व मार्केट पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टमनी यांनी कोरोनाचे संकट असल्यामुळे विसर्जन करण्यासाठी अधिक प्रमाणात गर्दी होऊ नये याकडे सर्वांनी लक्ष द्यावे तसेच प्रशासनाच्या सूचनेनुसार विसर्जन करण्यासाठी प्रत्येक मंडळाच्या दहा कार्यकर्त्यांनी विसर्जन तलावावर यावे आणि आरती झाल्यानंतर विसर्जनासाठी विलंब करू नये. सर्व विसर्जन तलावांवर गणेशोत्सव मंडळांच्या फक्त दहा कार्यकर्त्यांनाच आत प्रवेश दिला जाईल मूर्तीचे वजन जास्त असल्यास या ठिकाणी कार्यरत असलेले पोलिस व महापालिकेचे कर्मचारी मदत करतील अशी माहिती यावेळी देण्यात आली.

हेही वाचा: धक्कादायक! मोबाईल वापरावर निर्बंध लावल्याने 17 वर्षीय मुलीची आत्महत्या

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व मंडळ आणि गणेशोत्सव साजरा केला आहे तसेच लहान मूर्तीची प्रतिष्ठापना व लहान मंडप घालून आपली विधायकता दाखवून दिली आहे त्याच प्रमाणे विसर्जना दिवशी मंडळ आपली जबाबदारी पार पाडतील मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांवर दबाव घालू नये अशी मागणी केली. यावेळी महामंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुसकर शहापूर विभागाचे अध्यक्ष नेताजी जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी विकास कलघटगी, सागर पाटील, मेघन लंगरकांडे, सतीश गौरगोंडा, रमेश सौन्टक्की, विजय जाधव, रवी कलघटगी,राजकुमार खटावकर आदी उपस्थित होते.

loading image
go to top