जिल्ह्यात नऊपर्यंत 8.70 टक्के मतदान

Up to nine in the district polled 8.70 percent
Up to nine in the district polled 8.70 percent

नगर: जिल्ह्यात आज पावसाने उघडीप दिल्याने सकाळी आठनंतर मतदारांत उत्साह संचारला. सकाळी नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात 8.70 टक्‍के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेचे दिली. दरम्यान, काही मतदान केंद्रांवर सकाळी नऊपर्यंत मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड असल्याने मतदान प्रक्रीया सुरु होण्यास विलंब झाल्याच्या घटनाही घडल्या.

इसळक (ता. नगर) येथील मतदान केंद्रावरील मशिन नादुरुस्त झाल्याने सकाळी नऊपर्यंत तेथे मतदान प्रक्रीया सुरु होवू शकली नाही. त्यामुळे पथकाने तेथे धाव घेऊन मशिन दुरुस्त केली. दरम्यान, तत्पूर्वी अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तेथे चकरा मारल्या होत्या. या गैरसोयीबद्दल मतदारांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, या प्रकाराने तेथील प्रशासकीय यंत्रणा तणावात होती.

जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी नगर शहरात मतदानाचा हक्‍क बजावला.
कोपरगाव मतदान केंद्रात येसगाव येथे विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे व बिपिन कोल्हे यांनी मतदानाचा हक्क बजावला. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनी विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व त्यांच्या पत्नी धनश्री यांनी सकाळीच लोणी (ता. राहता) येथे मतदानाचा हक्क बजावला.


विधानसभेचे उपसभापती विजय औटी व त्यांच्या पत्नी जयश्री यांनी पारनेर येथे मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे गावातील मतदान केंद्राची पाहणी केली. प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. राळेगणसिद्धी येथे सकाळीच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कान्हूरपठार (ता. पारनेर) येथेही सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com