Shashikala Jolle complaint to Nitin Gadkari
esakal
निपाणी : येथील राष्ट्रीय महामार्गावरील महात्मा गांधी रुग्णालयाजवळील (Mahatma Gandhi Hospital flyover wall collapse) उड्डाणपुलाची भिंत कोसळल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्ते निर्मिती विभागाने आत्तापर्यंत झालेले काम आणि कामाचा दर्जा याचे सर्वेक्षण करावे. घटनेबद्दल आपण केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी केली. बुधवारी (ता. २९) कोसळलेल्या भिंतीची पाहणी करून त्या बोलत होत्या.