निपाणी : अवकाळीने ऊस तोडणी यंत्रणा जागेवरच

शेती परिसरात पाणी साचल्याने ऊस तोडणीवर त्याचा परिणाम झाला असून बऱ्याच भागातील ऊस तोडणी खोळंबल्या आहेत.
अवकाळीने ऊस तोडणी यंत्रणा जागेवरच
अवकाळीने ऊस तोडणी यंत्रणा जागेवरच Sakal

बेडकिहाळ : गेल्या महिनाभरापासून अधूनमधून ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस होत आहे. अवकळी पावसाने काढणीस आलेल्या बऱ्याच पिकावर परिणाम झाला असून हातातोंडाशी आलेली पिके घरापर्यंत आणणे कठीण झाले आहे. अवकाळीने शेती परिसरात पाणी साचल्याने ऊस तोडणीवर त्याचा परिणाम झाला असून बऱ्याच भागातील ऊस तोडणी खोळंबल्या आहेत. परिणामी ऊस तोडणी यंत्र जागेवरच आहे.

यंदा ऊस गळीत हंगाम वर्षाच्या तुलनेत लवकरच प्रारंभ झाला आहे. प्रारंभीपासूनच ऊस तोडणी यंत्र तोडणीसाठी सरसावली. त्यामुळे १५ ते २० दिवस ऊस तोडणी हंगाम सुरळीत चालू झाला. अवकाळी पावसाने ऊस तोडणीवर परिणाम झाला असून बैल गाड्या, ट्रॅक्टर, गाड्या शेतीतून ऊस भरून येताना शेतात अडकल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. ऊसतोडणी बंद असल्याने ऊसतोड यंत्र, ट्रॅक्टर, बैलगाड्या जागेवरच थांबून आहेत. त्यामुळे शेतकरी व ऊसतोड मजुरांची कसरत सुरु झाली आहे.

अजून नदी परिसरातील ऊस तोडणी चांगली सुरळीत सुरु होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागणार असल्याचे ऊस उत्पादक शेतकरी अजित बाबर यांनी सांगितले.

--------------

nip0714

सुहास डोमणे

परिसरात ऊस तोडणी यंत्रावरच ऊस तोड होणार म्हणून दीड ते दोन कोटीची गुंतवणूक करून यंदा गळीत हंगाम चालू होण्यापूर्वीच ऊस तोडणी यंत्र घेतले आहे. त्यावर दोन ट्रॅक्टर्स, चालक व इतर मजूर असे एकूण १० ते १५ लोक अवलंबून आहेत. सध्या ऊस तोड यंत्रे बंद असलीतरी या सर्वांनचा पगार द्यावा लागत आहे. व्याज चालूच राहणार असल्याने ऊस तोड यंत्रधारकांची स्थिती कठीण आहे.

-सुहास डोमणे,

ऊसतोड यंत्रधारक, बेडकिहाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com