सुट्टीनंतर गजबजली आयटीआय महाविद्यालये | Nipani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुट्टीनंतर गजबजली आयटीआय महाविद्यालये

निपाणी : सुट्टीनंतर गजबजली आयटीआय महाविद्यालये

निपाणी : दिवाळी सणात चार दिवस बंद असलेली तालुक्यातील आयटीआय महाविद्यालये पुन्हा गजबजली आहेत. दिवाळीनंतर आयटीआयमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढल्याने अभ्यासक्रमाला चांगलीच गती आली आहे. त्यामुळे यंदा शिक्षकांना वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.

दिवाळीपूर्वी आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अल्प प्रमाणात दिसत होती. ही संख्या आता पूर्ण क्षमतेने दिसत आहे. आॅनलाईन परीक्षेमुळे शिक्षक वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. निपाणी परिसरासह खेड्यातील विद्यार्थ्यांनी यंदा फिटर, इलेक्ट्रीशियन ट्रेडला पसंती दिली आहे. बससेवाही सुरु झाल्याने विद्यार्थी महाविद्यालयाला नियमित येत आहेत. प्रतिवर्षी निपाणी तालुक्यातून 2500 विद्यार्थी विविध ट्रेडचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात.

हेही वाचा: निपाणी : निविदा बोलावण्यावरुन प्रशासनाचा संभ्रम

कोरोना, महापूर, अतिवृष्टीमुळे दोन वर्षे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा जोमाने अभ्यासाला लागले आहेत. यंदाही विविध ट्रेडची आॅनलाईन परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी आतापासून अभ्यासाला लागले आहेत. दिवाळीपूर्वी खेडेगावातील बससेवा सुरळीत नसल्याने अनेक पालक विद्यार्थ्यांची ने-आण करत होते. त्यामुळे त्यांचाही वेळ वाया जावून कामाचा खोळंबा होत होता. आयटीआय महाविद्यालये व बससेवाही सुरु झाल्याने विद्यार्थी, पालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

`दिवाळीनंतर आयटीआय महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहेत. विद्यार्थी पटसंख्याही वाढली आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सोयीचे झाले आहे. त्याचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांना लाभ होणार आहे.`

- अजित सातवर, प्रशिक्षक, सरकारी आयटीआय, निपाणी

निपाणी आयटीआय काॅलेज दृष्टिक्षेपात...

ट्रेड - विद्यार्थी संख्या

फिटर - 60

इलेक्ट्रीशियन - 22

मोटर व्हेईकल मॅकेनिक - 22

डिझेल मॅकेनिक - 22

loading image
go to top