मंगळवेढयात निर्भया पथकाची रोडरोमिओंवर कारवाई

हुकूम मुलाणी
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मंगळवेढा : शहर व ग्रामीण भागात वाढलेल्या छेडछाडीविरोधात पोलिसांनी मोहिम उघडली असून आज निर्भया पथकाने केलेल्या कारवाईत सात जण सापडले असून यांच्या पालकांना बोलावून त्यांचे निर्भया पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शाहूराज दळवी यांनी समुपदेशन केले. 

मंगळवेढा : शहर व ग्रामीण भागात वाढलेल्या छेडछाडीविरोधात पोलिसांनी मोहिम उघडली असून आज निर्भया पथकाने केलेल्या कारवाईत सात जण सापडले असून यांच्या पालकांना बोलावून त्यांचे निर्भया पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शाहूराज दळवी यांनी समुपदेशन केले. 

शहर व ग्रामीण भागात जुन महिन्यात 80 व जुलै महिन्यात 70 अशा आत्तापर्यंत 150 छेडछाडीची प्रकरणे निर्भया पथकाकडे प्राप्त झाली. छेडछाडीचे प्रमाण रोखण्यासाठी शहरातील श्री संत दामाजी कॉलेज, माचणूर येथील श्री सिध्देश्वर प्रशाला, मरवडे येथील हनुमान विद्यामंदिर, येड्राव येथील पाटील विद्यालय, नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालय येथे मुला-मुलींची मार्गदर्शनपर शिबीरे घेण्यात आली. शहरातील बसस्थानक, कॉलेज मार्ग, आठवडी बाजार, शाळाबाह्य व शाळेतील विद्यार्थ्यांवर निर्भया पथक करडी नजर ठेवून असून रोडरोमिओंना अटकाव करण्यासाठी सिव्हील ड्रेसवर शहरातून गस्त घालत आहे. यामध्ये एक अधिकारी, एक महिला पोलिस व एक पुरूष पोलिस यांचा समावेश आहे. मोटारसायकलवर ट्रिपलशीट फिरणारे, गाडीच्या पुंगळ्या काढून आवाज करणारे रोडरोमिओंवरही हे पथक कारवाई करत आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वासराव नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, निर्भया पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शाहूराज दळवी, पोलिस हवालदार अजित मिसाळ, पोलिस हवालदार सावंत, महिला पोलिस शोभा कदम यांनी ही कारवाई केली. सदर तक्रारीतील मुलांच्या पालकांना बोलावून समुपदेशन करण्यात आले. यावेळी पालकांना आपल्या मुलाकडे वेळीच लक्ष द्या, मुलगा कोणाच्या संगतीत आहे. याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, मुलांना चांगल्याची संगत करण्यास सांगा अशा सक्त सुचना यावेळी देण्यात आल्या.

Web Title: Nirbhaya squad action taken against roadromeo in magalwedha