पर्यावरण दिनानिमित्त उद्या 'सकाळ'तर्फे निसर्ग भ्रमंती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

सोलापूर - प्लास्टिकचा वापर टाळणे, वृक्षारोपण करणे, जैवविविधतेच्या अभ्यासातून पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो हे जाणून घेण्यासाठी पर्यावरण दिनानिमित्त "सकाळ'च्या वतीने निसर्ग भ्रमंती आयोजिली आहे. हा कार्यक्रम मंगळवारी (ता. 5) सकाळी साडेसात वाजता संभाजी तलाव परिसरातील स्मृती वन उद्यानात होणार आहे. 

सामाजिक वनीकरण विभागाने संभाजी तलावाशेजारील माळरानावर पर्यावरणप्रेमींच्या सहकार्याने स्मृती वन उद्यान फुलविले. शेकडो प्रकारच्या झाडांसह वन्यजीवांचा अधिवास या ठिकाणी आढळून येतो. निसर्ग परिचय केंद्रात स्थानिक छायाचित्रांनी टिपलेली विविध पशू-पक्ष्यांची छायाचित्रे याठिकाणी पाहायला उपलब्ध आहेत. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सोलापुरातील जैवविविधता जाणून घेण्यासाठी सकाळ'ने स्मृती वन उद्यानात निसर्ग भ्रमंतीचा उपक्रम आयोजिला आहे.
 
सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने, कर्मचारी संजय भोईटे हे पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने सोलापूरकरांशी संवाद साधणार आहेत. या निमित्ताने पर्यावरण संवर्धनविषयक माहितीपट दाखविण्यात येणार आहे. या उपक्रमात पालकांनी आपल्या मुलांसह सहभागी व्हावे, असे आवाहन 'सकाळ'तर्फे करण्यात आले आहे. 

भ्रमंतीत काय पाहायला मिळणार...?

  •  विविध प्रकारची, प्रजातींची झाडं
  • शक्‍य झाल्यास मोर, ससा, मुंगूस यांचेही दर्शन होणार
  • विविध पशू-पक्ष्यांची छायाचित्रे
  • निसर्गविषयक माहितीपटही मिळणार पाहायला 
कधी मंगळवारी (ता. 5 जून) 
कुठं विजापूर रस्त्यावरील संभाजी तलावाशेजारील स्मृती वनात 
वेळ अगदी सकाळी म्हणजे बरोबर साडेसातच्या ठोक्‍याला

Web Title: Nisarga Bhramanti from sakal media occasion on Environment Day