
मिरज : मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी बकरी ईदबाबत केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार इद्रीस नायकवडी यांनी निषेध केला. ‘‘बकरी ईद कशी साजरी करावी, हे मुस्लिमांना चांगलेच माहीत आहे. केवळ प्रसिद्धीसाठी आणि द्वेष पसरविण्यासाठी मंत्री राणे यांनी वादग्रस्त वक्तव्याचे असे बालिश उद्योग करु नयेत,’’ अशीही टीका आमदार इद्रिस नायकवडी यांनी केली. मंत्री नीतेश राणे यांनी बकरी ईद आभासी पध्दतीने साजरी करण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला.