माजी खासदार निवेदिता माने उद्या करणार शिवसेनेत प्रवेश

माजी खासदार निवेदिता माने उद्या करणार शिवसेनेत प्रवेश

रुकडी - राष्ट्रवादीकडून माने गटावर झालेला अन्याय व गटाला नेहमी ग्रहीत न धरण्याचे धोरण यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांच्या मातोश्री अखिल भारतीय राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा व माजी खासदार निवेदिता माने शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या (शनिवारी) प्रमुख कार्यकर्त्यासह मुंबई येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदार संघ हा माने गटाचा पारंपारिक मतदार संघ असताना सातत्याने माने गटाला येथे  डावलण्यात येत आहे. यंदा हा गट स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात आला आहे. या कारणास्तव माने गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय रुकडीतील मेळाव्यात घेतला होता. शेट्टी व माने गट हे पांरपारिक राजकीय विरोधक आहेत.

निवेदिता माने यांना राष्ट्रवादीच्या गोटातून विधानपरिषद सदस्यपद देण्याचा शब्द दिला होता. मात्र आमदारकीतर लांबच पण माने गटाची पक्षांतर्गंत मुस्कटदाबी सुरू करण्यात आली होती. यामुळे माने गट राष्ट्रवादीवर नाराज होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com