शिवसेना आवाडे युतीचा बार फुसका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

हुपरी - माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या आडमुठ्या धोरणामुळे हातकणंगले तालुक्‍यात आवाडे गटाबरोबरची आघाडी बिनसल्याचे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सांगितले.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हातकणंगले तालुक्‍यात आवाडे गट व शिवसेना यांच्यात आघाडी होणार अशी चर्चा सुरू होती. त्या अनुषंगाने कोल्हापूर येथे माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, साताप्पा भवान, बाजीराव पाटील, रघुनाथ नलवडे आदींच्या उपस्थितीत बैठकही झाली, पण जागा वाटपात एकमत न झाल्याने आवाडे-शिवसेना आघाडीचा बार फुसका निघाला.

हुपरी, रेंदाळ, पट्टणकोडोली, कोरोची, कबनूर, हेर्ले आदी ठिकाणी शिवसेनेचे प्राबल्य असल्यामुळे या ठिकाणी सेना आग्रही होती. प्रकाश आवाडे यांनी या जागांवरही दावा सांगितला होता. आवाडे यांच्या आडमुठ्या धोरणामुळेच आघाडी होऊ शकली नाही, असे जिल्हाप्रमुख जाधव यांनी सांगून स्वाभिमान गहाण ठेवून कदापिही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: No alliance in Shivsena Aawade