जिल्हा बॅंकेतील पैशाचा ठणठणाट कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

कोल्हापूर - नोटाबंदीनंतर राष्ट्रीयीकृत बॅंकांना पुरेसा चलनपुरवठा होत आहे. त्यांची एटीएम मशीनही सुरू आहेत; पण जिल्ह्याची प्रमुख आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा बॅंकेत मात्र पैशाचा ठणठणाट आजही कायम आहे. नोटाबंदीच्या 48 दिवसांनंतरही जिल्हा बॅंकेला पुरेसा चलनपुरवठा न झाल्याने बॅंकेच्या मुख्य कार्यालयासह शाखांचे कामकाज ठप्प आहे.

देशात 8 नोव्हेंबरपासून जुन्या 500 व 1000 च्या चलनी नोटा रद्द ठरविल्या. सुरवातीला या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बॅंकांना परवानगी होती, पण त्यावर निर्बंध घातले. पहिल्या दोन-तीन दिवसांत असलेल्या परवानगीच्या काळात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत 249 कोटींच्या नोटा जमा झाल्या. या नोटांनी बॅंकेची स्ट्रॉंगरूम फुल्ल आहे.
जिल्हा बॅंकेला दैनंदिन व्यवहारासाठी किमान 22 कोटी लागतात; पण गेल्या 48 दिवसांत जास्तीत जास्त सहा कोटींच्या वर रक्कम मिळालेली नाही. बॅंकेच्या शाखांत दूध व उसाची मिळून 450 कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. काल बॅंकेला 50 लाख तर आज 20 लाख मिळाले, पण एवढी तटपुंजी रक्कम शाखांना पाठवता येत नसल्याने शाखांचे कामकाज बंद आहे.

एकीकडे जिल्हा बॅंकेला पुरेसा चलनपुरवठा होत नसताना ज्या राष्ट्रीय बॅंकांत नोटाबंदीच्या काळात घोटाळे झाले त्यांना मात्र लागेल तेवढा चलनपुरवठा केला जात आहे. 500 च्या नव्या नोटाही या बॅंकांत तसेच त्यांच्या एटीएम मशीन्समधून मिळत आहेत. दुसरीकडे जिल्हा बॅंकेला मात्र लागेल तेवढा चलनपुरवठा होत नसल्याने बॅंकेत ठणठणाट आहे.

Web Title: no money in district bank