मतदार यादीवर एकही हरकत नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारू मतदार यादीवर रात्रीपर्यंत एकही हरकत आली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. यावरून महसूल विभागाच्या कामाची अचूकता लक्षात येते. हरकत आली नसल्यामुळे आता यापूर्वी प्रसिद्ध झालेली प्रारूप यादीच अंतिम मतदार यादी असणार आहे. ता. २१ जानेवारीला ही मतदार यादी प्रसिद्ध होईल. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात २१ लाख ४६ हजार ७७६ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. पुरवणी मतदार यादीत ४४ हजार ६७ मतदारांची नावे आहेत.

जिल्हा परिषदेच्या ६७, पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होईल. निवडणूक आयोगाने पाच जानेवारीला प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादी यासाठी ग्राह्य धरली आहे. मतदार यादी १२ जानेवारीला प्रसिद्ध झाली; मात्र यावरील हरकतीचे प्रमाण अल्पप्रमाणात आहे. ज्या हरकती, सूचना आल्या आहेत, त्याची सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येईल. 

विधानसभेच्या मूळ मतदार यादीत कसलीही दुरुस्ती होणार नाही. प्रभागनिहाय विभाजन करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यात येतील. मतदार यादीच्या प्रारूप आणि पुरवणी मतदार यादी अशी विभागणी केली असून, या यादीत सर्वाधिक तीन लाख ५७ हजार ८०१ करवीर तालुक्‍यातील मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गगनबावडा तालुक्‍यांत सर्वांत कमी मतदार (२६०९४) आहेत.

Web Title: no objection on voting list