एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला तरीही मजुरांना वेतन नाही

हुकूम मुलाणी
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मंगळवेढा (सोलापूर) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामावरील मुजरांचे वेतन 15 दिवसाच्या आत देण्याचे नियम असताना देखील तब्बल महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला अद्यापही मजुरांचे वेतन खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे दुष्काळात मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाची उदासीनता पहिल्या महिन्यातच दिसून येत आहे यापुढील काळात मजुरांना काम आणि वेतन किती लवकर देणार याबाबत मुजरातुन संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तालुक्यात पंचायत, कृषी, सामाजिक वनीकरण या खात्यामार्फत कामे सुरू असून पंचायत समितीने घरकुल तर कृषी विभागाने फळबाग, शेततळे आदी कामे सुरू आहेत, तर सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्याच्या कडेला दुतर्फा वृक्ष लागवड केली. पण या काम करणाऱ्या मजुरांचे वेतन हे हजेरी पत्रक भरल्यानंतर पंधराव्या दिवशी थेट बँक खात्यावर थेट जमा करणे आवश्यक आहे.

नागपूर येथून थेट बॅंक खात्यावर जमा होत आहे. या योजनेत गैरप्रकार कमी झाले पंचायत समिती कृषी विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाने नागपूरच्या कार्यालयाला कळवूनही अजूनही 1 आक्टोबरपासूनचे वेतन बँक खात्यावर वेतन जमा नाही. यात दिरंगाई करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला दंडाची कारवाई होते. या दिरंगाईची जबाबदारी कुणावर टाकायची दुष्काळी असलेल्या तालुक्‍यांमध्ये या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घेता घेता येतात शासनाने तालुका दुष्काळ जाहीर केल्यामुळे शेती विषयक शेती विषयी व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी दुष्काळ ही एक संधी आहे या संधीचा लाभ घेण्यासाठी शेतकरी लाभार्थी इच्छुक असताना प्रशासनाची मात्र यात उदासिनता दिसून येत पुढील कालावधीत  कामाचे नियोजन  कसे करून मजुराना वेतन वेळेत देण्याचे नियोजन कसे करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुष्काळ परिस्थितीत मजुराचे वेतन वेळेत मिळाले पाहिजे रोजगारसेवकाचे मानधनही दिड वर्षापासून  मिळाले नाही प्रशासनाने उदासिन धोरणाचा फटका आमच्यासह मजुराला बसला.
- सुनिल शिंदे, अध्यक्ष, ग्रामरोजगार सेवक संघटना

जिल्ह्यातील या कामावरील मजुराचे वेतन करण्याबाबतचा एफ.टी ओ. नागपूर कार्यालयास यापूर्वीच कळविले आहे.तिथून मजूराचे वेतन ई-एफ एस प्रणाली  व्दारे थेट बॅक खात्यात जमा होणार आहे. 
- प्रसन्ना जाधव, समन्वयक, रोहयो

चारा टंचाईमुळे फेब्रुवारी पासून मजुराना काम देण्याचे नियोजन  आता करावे असा प्रश्न आ. भालके यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत मांडला पण रोहयोची कामे करण्याबाबत प्रशासन किती गांभीर्याने  घेते हाच खरा प्रश्न  आहे.

Web Title: no payment to labors after 1 month