esakal | चुकीला माफी नाही...रविना, फराह खान, भारती सिंहवर नगरमध्ये अजामीनपात्र गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Non-bailable offense against Ravina Tandon, Farah Khan, Bharti Singh

या तिघींना तो शब्द आणि धार्मिक भावना याची पुरेपूर जाण असतानाही जाणीवपूर्वक केवळ धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने हा निंदनीय प्रकार केला. अशा आशयाचा त्या तिघींवर आरोप आहे. त्यामुळे धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

चुकीला माफी नाही...रविना, फराह खान, भारती सिंहवर नगरमध्ये अजामीनपात्र गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर: सर्व भारत देश लॉकडाऊन आहे. नेते, अभिनेत्यांसह सर्वच घरात बंद आहेत. मात्र, बॉलीवूडमधील तीन बड्या अभिनेत्रींविरूद्ध नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अभिनेत्रींविरुद्ध एका धर्माच्या भावना दुखावल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण जुने असले तरी त्याबाबत तीन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित अभिनेत्रींनी माफी मागितली होती. परंतु फिर्यादीने गुन्हा दाखल करण्याची भूमिका कायम ठेवली.

हेही वाचा - या नेत्याने लॉकडाउनमध्ये चालवलंय कुत्र्यांसाठी अन्नछत्र

याप्रकरणी नगर येथील एका व्यक्तीने फिर्याद दिली. दिनांक २५ डिसेंबर २०१९ च्या एका लाईव्ह कार्यक्रमात रविना टंडन, फराह खान व भारती सिंह यांच्यातील कार्यक्रमात सुरू असणाऱ्या एका स्पर्धेत त्यांनी एका धर्माच्या पवित्र शब्दाचा गैरअर्थ व अपभ्रंश करणारा शब्द सांगत त्या मूळ शब्दाची तिघींनी खिल्ली उडविणारे हावभाव व शब्दफेक केल्याचा आरोप फिर्यादीचा आहे.

या तिघींना तो शब्द आणि धार्मिक भावना याची पुरेपूर जाण असतानाही जाणीवपूर्वक केवळ धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने हा निंदनीय प्रकार केला. अशा आशयाचा त्या तिघींवर आरोप आहे. त्यामुळे धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
फराह खान रा. संजय प्लाझा एबी नय्यर रोड, जूहू नवी मुंबई, भारती सिंह रा. नवी मुंबई व अभिनेत्री रविना टडंन रा. निपून सोसायटी टंडन हाऊस जूहू मुंबई यांच्याविरुद्ध
हेतूपुरस्पर जाणून बूजून नियोजित कट रचून संगनमताने धार्मिक भावना दुखवण्याचे कृत्य केल्याने त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी फिर्यादीने केली होती.
त्यानुसार नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात या तिघी अभिनेत्रींच्या विरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image