वाहन विश्‍वात उलाढालीचा चक्काजाम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

सांगली - पाचशे, हजारच्या नोटांवर बंदी आल्यानंतर लोकांनी जीवनावश्‍यक वगळता अन्य बड्या खरेदीकडे पाठ फिरवली. त्याचा मोठा परिणाम वाहन विश्‍वावर झाला. दुचाकी वाहनांची खरेदी सुमारे 80 टक्के, तर चारचाकी वाहनांची खरेदी 70 टक्‍क्‍यांनी घटली. आकड्यांत बोलायचे तर कोट्यवधीच्या "डील' थांबल्यात. 

सांगली - पाचशे, हजारच्या नोटांवर बंदी आल्यानंतर लोकांनी जीवनावश्‍यक वगळता अन्य बड्या खरेदीकडे पाठ फिरवली. त्याचा मोठा परिणाम वाहन विश्‍वावर झाला. दुचाकी वाहनांची खरेदी सुमारे 80 टक्के, तर चारचाकी वाहनांची खरेदी 70 टक्‍क्‍यांनी घटली. आकड्यांत बोलायचे तर कोट्यवधीच्या "डील' थांबल्यात. 

जिल्ह्यातील वाहन विश्‍वाचा मोठा ग्राहक ग्रामीण भागातील आहे. शेती किंवा शेतीपूरक व्यवसायाशी तो निगडित आहे. परिणामी, त्याचे आर्थिक व्यवहार जिल्हा बॅंक, पतसंस्था किंवा हातचे राखून साठवून, बचत करून ठेवलेले पैसे, अशा स्वरूपातील आहेत. त्यामुळे दुचाकी वाहन खरेदीवर मोठा परिणाम झाला. महिन्याकाठी 4 हजार दुचाकींची विक्री व्हायची. त्या ठिकाणी आता केवळ 700 दुचाकींचे व्यवहार झालेत. कर्ज काढून वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी अडचणीचे विषय आहेत; शिवाय रोखीच्या व्यवहारांत नोटांची पुरेशी उपलब्धता नसणे यामुळे मोठी अडचण होत आहे. अगदी वाहनांच्या सर्व्हिसिंगलाही लोक येईनात, असा अनुभव "सिद्धिविनायक'चे श्रीकांत तारळेकर यांनी सांगितला. 

चारचाकी वाहन खरेदीत डाऊन पेमेंट हा विषय अडचणीचा असल्याचे सांगण्यात आले. पन्नास हजार ते एक लाख रुपये रोखीने भरणे शक्‍य नाही. फॅमिली कार घेणाऱ्यांचे बहुतेक व्यवहार चेकने होतात, मात्र या काळात व्यवहार करावेत की नको, अशा गोंधळातही काही लोक आहेत. काहींनी पाचशे, हजारच्या नोटा घेऊन शोरुम गाठले, मात्र तेथे व्यवहाराला नकार देण्यात आला. व्यावसायिक छोट्या वाहनांच्या उलाढालीवर मात्र मोठा परिणाम झाला आहे. 

वाहनविश्‍व आकड्यांत 

* दुचाकीवर परिणाम ः 80 टक्के 
* उलाढाल थांबली ः सुमारे 20 कोटी 
* चारचाकीवर परिणाम ः 70 टक्के 
* उलाढाल परिणाम ः सुमारे 25 कोटी 

""दुचाकी वाहनांचा मोठा ग्राहक ग्रामीण आहे. त्यांचे व्यवहार चेक किंवा ऑनलाइन बॅंकिंगद्वारे फार कमी होतात. रोखीतील व्यवहार अधिक, परिणामी डाऊन पेमेंट भरण्यातही अडचणी आहेत. साहजिकच दुचाकीच्या मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे.'' 

-बिपीन साळस्कर, व्यवस्थापक, मिलेनियम होंडा 

""छोट्या व्यावसायिक वाहनांच्या खरेदीवर नोटाबंदीनंतर मोठा परिणाम दिसत आहे. अशा पद्धतीची वाहने खरेदी करणारा ग्राहक सामान्य असतो, जो बहुतांश व्यवहार रोखीने करतो. त्याला नवे वाहन खरेदी करताना कर्ज घेणे भाग असते, मात्र डाऊनपेमेंट हे रोखीनेच होते. पाचशे, हजारच्या नोटा आम्ही घेत नाही. त्या बॅंकेत भरल्या तरी चालणाऱ्या नोटा त्या प्रमाणात मिळत नाहीत. परिणामी, ग्राहक थांबला आहे.'' 
- नितीन कुलकर्णी,  संचालक, पंडित ऑटोमोटिव्ह...

Web Title: note ban affected on vehicle business