तमाशा, ऑर्केस्ट्रा करायचा कसा ? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

सांगली - करोली-एम (ता. कवठेमहांकाळ) गावाचं शिष्टमंडळ आज जिल्हा बॅंकेत येऊन धडकलं. माजी सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे पदाधिकारी आणि सोबत बाजार समितीचे माजी उपसभापती जीवन पाटील होते. श्री यल्लम्मा देवीची यात्रा करायची आहे. बॅंकेत सव्वा लाखावर रक्कम जमा आहे. ती काढल्याशिवाय यात्राच शक्‍य नाही, तमाशा आणि ऑर्केस्ट्राला पैसे द्यायचे कसे, असा सवाल घेऊन ते आले होते. जत्रा, यात्रा, उरूस संयोजन समितीची गतसालातील शिल्लक रक्कम अडकून पडल्याने गावोगावी अशा समस्या निर्माण झाल्यात. 

नोटबंदीच्या आदेशानंतर सर्वाधिक कोंडी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची झाली. बॅंकेला आतापर्यंत 50 कोटी रुपयांचे नवीन चलन मिळाले. मात्र 217 शाखा आणि 18 लाख ग्राहकांना ही रक्कम पुरणार कशी? कधी पाचशे, कधी हजार तर फारच क्वचित दोन हजार रुपये देऊन ग्राहकांची समजूत काढण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली. आता यात्रा करायची म्हटल्यावर मोठीच अडचण झाली. करोलीचीच गोष्ट घ्यायची झाल्यास, गेल्यावर्षीची सव्वा लाख रुपये शिल्लकीची रक्कम जिल्हा बॅंकेत आहे. त्यामुळे यंदा लोक म्हणाले,""मागच्या पैशातून करा खर्च, नव्या वर्गणी थोड्यात घ्या.'' 

एक तमाशा 40 हजार, ऑर्केस्ट्रा 35 हजार आणि कुस्तीच्या फडाला लागतात 40 हजार. बाकी किरकोळ खर्च. या शिल्लक पैशात निभावून जाईल, असा अंदाज समितीने बांधला. परंतु, जिल्हा बॅंकेतून एकरकमी पैसे मिळणे शक्‍य नाही. त्यामुळे मंडळी व्यवस्थापक मानसिंग पाटीलना भेटली. आता "जिथं कमी, तिथं आम्ही', असा मंत्र घेऊन काम करणाऱ्या बॅंकेने कायद्यात बसवून मार्ग काढून दिला खरा, मात्र नोटाबंदीनंतर अशी गावोगावी ससेहोलपट सुरू आहे. विशेषतः जिल्हा बॅंकेच्या ग्राहकांची खूपच अडचण झाली आहे. 

आईनं सांगितल्यानं घरातच पैसे ठेवले 

प्राप्तीकर विभागाने परवाच जिल्हा बॅंकेवर छापा टाकला. त्यात काही लोकांनी पाच लाखांवर रक्कम भरल्याचे लक्षात आले. त्यात चार व्यापारी व एक निवृत्त बॅंक कर्मचाऱ्याचा समावेश होता. त्यांना बोलावून चौकशी केली गेली. त्यापैकी निवृत्ती बॅंक कर्मचाऱ्याने दिलेले कारण भन्नाट होते. निवृत्तीनंतर आलेली रक्कम आईने बॅंकेत भरू दिली नाही, त्यामुळे ती घरी होती. आता भरली, असा खुलासा त्यांनी केला.

Web Title: Note ban Fairs, urusa problem created