
सांगली : शहरातील कंत्राटदारास हत्याराचा धाक दाखवत पाच लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल असलेल्या कुख्यात गुंडास चार तासांत शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गजाआड केले. महेंद्र ऊर्फ बाळू वसंत भोकरे (वय ५०, रा. भुईराज सोसायटी, गणेशनगर) असे त्याचे नाव आहे. काल रात्री उशिरा ही कारवाई केली. दरम्यान, भोकरे यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.