आता गणेश मंडळांची परीक्षाही होणार ऑनलाइन!

सकाळ वृत्तसंस्था
शनिवार, 13 जुलै 2019

- राज्यभरात 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन परवाना देण्याची प्रक्रिया एक ऑगस्टपासून सुरु करण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे.

-  दरवर्षी गणेशोत्सव मंडळांकडून मंडपाची परवानगी असतानाही स्पीकर लावले जात असल्याची बाब पोलिसांच्या निर्दशनास आली.

सोलापूर : राज्यभरात 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन परवानगी देण्याची प्रक्रिया एक ऑगस्टपासून सुरु करण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे.

दरवर्षी गणेशोत्सव मंडळांकडून मंडपाची परवानगी असतानाही स्पीकर लावले जात असल्याची बाब पोलिसांच्या निर्दशनास आली. त्यामुळे पोलिसांनी आता सावध पवित्रा घेत वाढत्या ध्वनी प्रदूषणावर उपाय म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाबरोबरच स्पीकरची परवानगी घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now ganesh mandal will have online exam