
सांगली : जिल्ह्यात सुरू असलेल्या पशुगणनेसमवेत आता जनावरांना ‘टॅग’ (बिल्ला) देखील लावण्यात येणार आहे. हा ‘टॅग’ केवळ मोठ्या जनावरांना लावण्यात येणार आहे. दुधाच्या अनुदानासाठी जनावरांना पशुपालकांनी ‘टॅग’ लावून घेतलेला आहे, मात्र ज्या पशुपालकांनी जनावरांच्या कानाला ‘टॅग’ लावलेला नाही, अशा सर्व जनावरांच्या कानाला पशुगणनेवेळी ‘टॅग’ लावण्यात येणार आहे.