सांगली आता पूर्ण सुरक्षित; अफवांपासून सावध राहा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

व्हाट्सअॅप वरून जो 'चार हजार लोक खपले...' असे सांगणारी ऑडिओ क्लिप फिरत आहे, ती अत्यंत चुकीची आहे. व्यक्तींना शोधून कारवाई होऊ शकते. शंका आल्यास सांगली पोलिसांना फोन करा.' अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे.

सांगली : कोल्हापूर-सांगलीमध्ये मागील आठवडाभर पावसाने आणि महापुराने हाहाकार माजवला होता. कालपासून हे पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. सांगली सुरक्षित आहे असा संदेश सांगलीचे जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा यांनी दिला आहे.

'सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होती. मात्र आता पाणी उतरत आहे कोणताही धोका आता राहिलेला नाही. पुरामुळे आतापर्यंत नावेतून बुडून 17 जण तर अन्य 3 असे 20 लोक मृत झाले आहेत. यापेक्षा कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, काही माध्यमातून फेक न्यूज येत आहेत. विशेषत: व्हाट्सअॅप वरून जो 'चार हजार लोक खपले...' असे सांगणारी ऑडिओ क्लिप फिरत आहे, ती अत्यंत चुकीची आहे. व्यक्तींना शोधून कारवाई होऊ शकते. शंका आल्यास सांगली पोलिसांना फोन करा.' अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे.

सर्व देशभरातून सांगली, कोल्हापूरसाठी मदतकार्य सुरू आहे. काही रस्तेही आता सुरू झाले आहेत, तर काही रस्ते फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी खुले करण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now sangli is safe says Sangli district SP Suhail Sharma