Vidhan Sabha 2019 : आता किल्ला आपणच जिंकणार : शिवेंद्रसिंहराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार मुक्त सरकार आपण पाहिले आहे. भाजप त्यात यशस्वी झाले आहे.

सातारा : सातारा बालेकिल्ला होता आता तो संपला असल्याचे गर्दीवरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील बुरुज आता कोसळत आहेत. त्याची तटबंदी ढासळू लागली आहे. आपण आता किल्ला जिंकणार आहे. मनात जिद्द कायम ठेवा. वेगळी ओळख निर्माण करू. गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार मुक्त सरकार आपण पाहिले आहे. भाजप त्यात यशस्वी झाले आहे.
 
येथील सैनिक स्कूल मैदनावर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेच्या प्रारंभी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे भाषण झाले. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातारा येथील सभा म्हणजे एक ऐतिहासिक क्षण आहे. लोकांची गर्दी प्रचंड आहे. आपल्याला आता विजयाची काही अडचण नाही. आपण फक्त साक्षीदार नको तर भागीदार व्हायचे आहे. सातारा बालेकिल्ला होता आता तो संपला असल्याचे गर्दीवरून स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील बुरुज आता कोसळत आहेत. त्याची तटबंदी ढासळू लागली आहे. आपण आता किल्ला जिंकणार आहे. मनात जिद्द कायम ठेवा. वेगळी ओळख निर्माण करू.

गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार मुक्त सरकार आपण पाहिले आहे. भाजप त्यात यशस्वी झाले आहे. 370 कलम रद्द झाले. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. देशाची अखंडता ज्यांनी राखली, देशभक्ती जागवली. जगात आपली प्रतिमा निर्माण केली. जेवढा विश्वास त्यांनी आपल्यावर ठेवला तेवढे बळ आपण मोदींना देऊया. आपली भूमी त्यागाची आहे. ही भूमी शहीदांची आहे. आपल्याला क्रांतिकारी निर्णय करून दाखवायचा आहे. मोदींचे हात बळकट करुयात.
यावेळी लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासह विधानसभेचे महायुतीच्या उमेदवारांची व्यासपीठावर उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now we will win the fort says Shivinderaraje Bhosale