आता आठवडा पाच दिवसांचा

शिवाजीराव चौगुले
सोमवार, 14 मे 2018

चिखली (शिराळा) - येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याने पाच दिवसांचा आठवडा योजना आजपासून (ता.१४) अंमलात आणली आहे. सहकारी कारखानदारीत अशी योजना राबविणारा महाराष्ट्रातील पहिला कारखाना ठरला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. यावेळी नाईक म्हणाले, 'विश्वास'ने सातत्याने आधुनिकतेची कास धरून वाटचाल केली आहे. काळानुरूप कारखान्यात यंत्रसामग्रीत, व्यवस्थापनात बदल केले आहेत. सभासदांचा विश्वास कायम ठेवून शेतकरी आणि कर्मचार्‍यांच्या हितास प्रथम प्राधान्य दिले आहे. 

नियमानुसार रोजंदारीवरील कर्मचार्‍यांना हंगामी सेवेत रुजू करणे. हंगामी कर्मचार्‍यांना कायम सेवेत सामावून घेणे. कर्मचार्‍यांसाठी विमा योजना, वर्षातून एक दिवस कर्मचार्‍यांचा सहकुटुंब स्नेहमेळावा आयोजित करणे, नियमित पगारवाढ, दिपावली बोनस आदींची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू आहे. पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी सहकारी कामगार मंडळाकडून करण्यात आली होती. 'विश्वास' कामगार संघटनेने संचालक मंडळाकडे तसा पत्रव्यवहार केला होता. त्या अनुसरून संचालक मंडळाच्या बैठकीत पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

नव्या बदलानुसार कार्यालय कामकाजाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ अशी असणार आहे. कामगारांना ५ दिवस काम व शनिवार, रविवारी अशी सुट्टी राहील. ६ दिवसांच्या आठवड्यात ७ तास कामाप्रमाणे आठवड्यात ४२ तास होते, तर ५ दिवसाच्या आठवड्यात दर दिवशी ९ तास याप्रमाणे आठवड्याचे ४१.५ तास होतात. आठवड्यातील पूर्वीच्या तासापेक्षा अर्धा तास कमी झाला आहे. तसेच कारखान्यातील कर्मचार्‍यांचे आठवड्याचे ४८ तासाऐवजी ४७.५ तास प्रत्यक्ष कामाचे तास होत आहेत. पाच दिवसांच्या आठवड्यामुळे कर्मचार्‍यांना महिन्याला ४ एैवजी ८ दिवस सुट्टी मिळणार आहे. कर्मचार्‍यांना त्यांची वैयक्तिक कामे करण्यास सुट्टीचे जादा दिवस उपलब्ध झाले आहेत. या निर्णयामुळे वीज, पाणी, इंधन तसेच अतिरिक्त काम यावरील खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे, असेही ते म्हणाले. या वेळी उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील तसेच, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

Web Title: Now week is five days