सातारकरांची वाजपेयी यांना श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

खंडाळा : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दुखःद निधन झाले. त्यांचा अस्थिकलशाचा रथ सातारा जिल्ह्याच्या प्रवेशव्दारावर असणाऱ्या शिरवळ शहरात आल्यानंतर मोठ्या भावपुर्ण वातावरणात येथील विश्रामगृह चौकात अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी विश्रामगृहापासुन शिवाजी चौकमार्गे एस.टी. स्टँडपर्यंत या अस्थीकलशाला मान्यवरांनी हातात घेऊन मुख्य रस्त्याने श्रध्दांजली पर रॅली काढली. यावेळी रथा मध्ये दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. पालकमंञी सदाभाऊ खोत, अतुल भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उदय कबुले, सरपंच लक्ष्मी पानसरे, पुरुषोत्तम जाधव, अनुप सुर्यवंशी, भाजपा पदाधिकारी व शिरवळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर दुपारी खंडाळा येथे महामार्गावरील पारगाव येथे या अस्थिकलशाचे पुजन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली, यावेळी शंकरराव गाढवे, अजित यादव, अंकुश पवार, जीवनचंद्र देशमुख व इतर नागरिक उपस्थित होते.  

Web Title: obituary to Vajpayee from satara