बकरी ईद उत्साहात; मुस्लिम बांधवाकडुन 'सकाळ रिलीफ फंडाला' मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) परिसरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लीम समाजाच्या वतीने कोल्हापूर -सांगली पूरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडाला' पाच हजारांची मदत करण्यात आली.

पटवर्धन कुरोली : पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) परिसरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लीम समाजाच्या वतीने कोल्हापूर -सांगली पूरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडाला' पाच हजारांची मदत करण्यात आली.

आज येथील जामा मस्जिद येथे बकरी ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवानी नमाज पठन केले. " दै. सकाळ" ने पूरग्रस्तांसाठी एक कोटीचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. या पूरग्रस्तांसाठी पटवर्धन कुरोलीतील मुस्लिम बांधवांनी मदत देण्याचे आवाहन त्यांनी केले.  "दै. सकाळ" ने केलेल्या या आवाहनाला सर्व मुस्लिम बांधवानी प्रतिसाद द्यावा असे मत श्री. आतार यांनी मांडले. त्याला सर्व मुस्लिम बांधवानी प्रतिसाद देत तात्काळ पाच हजार रुपये जमा केले.

ही रक्कम रोख स्वरुपात 'सकाळ' कडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी उपसरपंच यासीन शिकलकर  माजी उपसरपंच शहाजान शेख, अस्लम शेख, अस्लम आतार, गफुर शिकलकर, नोशाद शिकलकर, उस्मान शिकलकर यांच्यासह सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the occasion of Bakri Eid Muslim Brothers Help Sakal Relief Fund