अधिकाऱ्यांनी केला मताचाही अपहार...

officer made fraud in soil of drainage work
officer made fraud in soil of drainage work

मिरज : शहरात सुरू असलेल्या ड्रेनेज योजनेच्या खोदाई कामांमध्ये निघालेल्या मातीतही महापालिका अधिकाऱ्यांनी अपहार केल्याचा केल्याचे मंगळवारी (ता.28) स्पष्ट झाले.

याबाबत महापालिकेच्या मिरज कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी नगरअभियंता श्री. एन. डी. दळवी आणि यांत्रिकी अभियंता आर. जी. राजपूत या दोघा अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी समितीद्वारे सखोल चौकशी करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे पाठविला आहे. यामुळे महापालिका प्रशासनातील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.

महापालिकेच्यावतीने सध्या शहरात ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे यासाठीचे पंप हाऊस आणि मुख्य वाहिनीचे काम एसएमसी इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनीकडे आहे. पंपहाऊस उभारणीसाठी केलेल्या खोदाईमधून 1 हजार 815 ब्रास माती काढून ती कमान वेस परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर टाकण्यात आली.

तेथून या मातीची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची माहिती महापालिका प्रशासनास मिळाली. याची सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी चौकशी केली असता यापैकी दीड हजारहून अधिक ब्रास मातीची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत नगर अभियंता दळवी आणि यांत्रिकी अभियंता आर. जी. रजपूत यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी याबाबत समाधानकारक खुलासा केला नाही.

त्यामुळे या दोघांविरुद्ध चौकशी समितीची नियुक्ती करून त्याद्वारे सखोल चौकशी करावी आणि त्यानंतर या समितीच्या शिफारशीस अनुसरून कारवाई करावी, अशी शिफारस करणारा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना पाठवला आहे. दरम्यान या घटनेमुळे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये असलेले मतभेद मात्र चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com