
बेळगाव : अधिकाऱ्यांना केंद्रातच थांबण्याचे आदेश
बेळगाव : कोविड-१९ (Covid-19)आणि ओमिक्रॉनच्या (Omicron)पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी थांबण्याचे आदेश आहेत. वैद्यकीय उपचारासाठी एकीकडे पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यासोबत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना विनाअनुमती केंद्रस्थान न सोडण्याबाबत कळविले आहे. आपत्कालीन संदर्भात त्वरीत सेवा बजाविण्यात यावी. रजा, साप्ताहिक सुटीच्या दिवशी जबाबदारी दिल्यानंतर अल्पावधीत पूर्ण करण्यात यावी, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्तांनी ७ जानेवारीला बजाविलेल्या आदेशात उल्लेख आहे.
हेही वाचा: नागपूरला ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर केले ; महापौर दयाशंकर तिवारी
कोविड-१९ (Covid-19)आणि यात ओमिक्रॉन (Omicron)बाधितांचे आकडे वाढत आहेत. पुढील सहा आठवड्यात ते चिंता वाढविणारे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी विविध पातळीवर व्यापक तयारी केली जात आहे. नियोजन केलेले आहे. सार्वनिजक कार्यक्रमांवर निर्बंध घालून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहे. याला जोडून प्रशासकीय पातळीवरही तयारी वेगात सुरु आहे. अधिकाऱ्यांना या कालावधीत तत्परता दाखविण्याचे आदेश आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्तांनी ७ जानेवारीला बजावले आहे.(Belgaum news)
हेही वाचा: महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कडक बंदोबस्त करा!
कोविड-१९ नियंत्रणामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिक खूप महत्वाचे आहे. या कालावधीत अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहाय्यकांनी समर्पक सेवा बजाविणे अपेक्षित आहे. आपत्कालीन परिस्थिती नियोजित वेळेत हाताळण्यासाठी बैठका आयोजित करण्यासोबत संसर्ग त्वरीत नियंत्रणाखाली कसा राहील, याचा अभ्यास केला जावा. शिवाय सध्याची भीषणस्थिती लक्षात घेतल्यास अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची गरज कधीही भासू शकते. यामुळे याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवेसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या जाव्यात. कोविड-१९ संसर्ग वाढत असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी ज्या ज्या सूचना बजावतील, त्याची काटेकोर कार्यवाही केली जावी. कोणत्याही कारणांनी विनापरवानगी आरोग्य केंद्र सोडून जाऊ नये.
हेही वाचा: यवतमाळ : किती हा भ्रष्टाचार? हाताने खणला जातोय रस्ता
वरीष्ठांचे आदेश पाळा
आदेश वा सूचना बजाविल्यानंतर त्याला त्वरीत प्रतिसाद देण्यात यावे आणि कमी वेळेत दिलेली जबाबदारी पार पाडली जावी. आपत्कलीन परिस्थितीत रजेच्या दिवशी किंवा साप्ताहिक सुटी दिवशीही काम केले जावे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी वेळेत पार पाडावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
Web Title: Officers Ordered To Stay At The Center
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..