कार्यालये कर्मचाऱ्याविनाच सुरु ; सोलापुरात संपात कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

तात्या लांडगे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

त्यामुळे कार्यालये उघडी होती. परंतु, त्याठिकाणी नुसत्या रिकाम्या खुर्चा दिसत होत्या. कर्मचारी संपावर गेल्याने सर्वसामांन्यांच्या कामाचा खोळंबा होताना दिसून येत आहे.

सोलापूर : सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा, अंशदान पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी ( वर्ग 3 व 4 ) यांच्या राज्यव्यापी संपात सोलापुरातील सहकार, अन्न-औषध प्रशासन, कृषी, महसूल, जिल्हा परिषद यासह विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उस्फूर्त पाठिंबा देत सक्रीय सहभाग नोंदविला.  

त्यामुळे कार्यालये उघडी होती. परंतु, त्याठिकाणी नुसत्या रिकाम्या खुर्चा दिसत होत्या. कर्मचारी संपावर गेल्याने सर्वसामांन्यांच्या कामाचा खोळंबा होताना दिसून येत आहे.

Web Title: Offices Empty Due to Not Available of Employee