संकेतस्थळ झाले अद्ययावत

विशाल पाटील
मंगळवार, 10 एप्रिल 2018

सातारा - सातारा जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ असलेले satara.nic.in हे संकेतस्थळ ‘सकाळ’च्या बातमीनंतर तत्काळ बदलले. सामाजिक व आर्थिक समालोचनची आकडेवारी २००१ नुसार, तर इतर माहिती २००६-०७ नुसार होती. जुनी माहिती काढून आता जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०१७ ची आकडेवारी अपडेट केली आहे. 

केंद्र, राज्य शासनाचे अधिकृत असलेल्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्‍स सेंटरमार्फत (एनआयसी) सातारा जिल्ह्याचे satara.nic.in हे अधिकृत संकेतस्थळ चालविले जाते. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियंत्रण आहे, तरीही या संकेतस्थळावर जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार होती. जनगणनेस सहा वर्षे उलटूनही त्यात बदल केला नव्हता. या संकेतस्थळावर मलकापूर ही एकच नगरपंचायत दाखविली होती. सदाभाऊ खोत यांची जिल्ह्याच्या सहपालकमंत्रिपदी नियुक्‍ती झाल्यानंतरही त्यांची माहितीही या संकेतस्थळावर नव्हती. दै. ‘सकाळ’ने ‘जिल्हाधिकारी कार्यालय संकेतस्थळ आळशी’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली. त्याची दखल घेत संकेतस्थळावर आज अद्ययावत माहिती अपलोड करण्यात आली आहे. 

Web Title: official site of Satara district changed immediately after the news of Sakal