आसबेवाडी ग्रामस्थांच्या काम बंदनंतर, अधिकाऱ्यांनी घेतली ग्रामस्थांची भेट 

हुकूम मुलाणी
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

मंगळवेढा - म्हैसाळ योजनेच्या 6 व्या टप्प्यातील पाण्याचा लाभ मिळत नसल्याने संतप्त आसबेवाडी ग्रामस्थांनी काम बंद पाडल्यानंतर अधिकाऱ्यानी ग्रामस्थाची भेट घेतली.

आसबेवाडीतून या योजनेची पाईपलाईन गेली पण लाभ कमी क्षेत्राला मिळत असल्याना शेतकऱ्यांची अवस्था म्हैसाळचे पाणी ऊशाशी, व कोरड मात्र घशाशी अशी अवस्था या झाल्याने दोन दिवसापुर्वी हे काम बंद पाडले होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्याला ग्रामस्थांनी सलगर बुद्रुक, सलगर खुर्द, सोड्डी शिवनगी, आसबेवाडी शिवनगी या गावातील उतारातील शेतीला मिळत असताना मुळ आराखड्यातून वगळलीच कशी सवाल केला. 

अधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की  पाईपलाईनला लागून असलेल्या तलावात पाणी सोडवण्यासाठी चेंबरमध्ये सोडण्यात यावे या प्रकल्पाच्या अहवालात उतारावरील क्षेत्राचा नव्याने समावेश केल्यास एक हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येवू शकते. याबाबतची प्रत जिल्हाधिकारी यांनाही दिली. जोपर्यंत या गावांचा समावेश म्हैसाळ योजनेत होत नाही. तोपर्यंत हे काम चालू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. या परिसरात 2009 च्या लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकून मतपेट्या रिकाम्या पाठवल्या होत्या ऐन निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा पाण्याचे आंदोलन सुरू झाल्याने हा प्रश्न गाजण्याची चिन्हे दिसू लागली.

लावात पाणी सोडवण्यासाठी आऊटलेट सोडले असून शेतकय्रांच्या मागण्याचे निवेदन घेवून वरीष्ठाना कळविले असून याबाबत शेतकय्रांना अधिक्षक अभियंत्याशी चर्चेला बोलावले आहे.
- शंकर शिंदे उपअभियंता म्हैसाळ कालवा जत

पिढ्यांनपिढ्या असलेल्या दुष्काळाची कमी होण्याच्या आशेवर असताना लाभ मात्र इतराना मिळत असल्याने किती दिवस असे सोसायचे आमच्या परिसरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय काम सुरू होवू देणार नाही. भागवत भुसे ग्रामस्थ आसबेवाडी

Web Title: officials meet aasabewadi people