सोलापूर - तलाठ्याच्या बोगस नोंदीला बसणार चाप 

सोलापूर - तलाठ्याच्या बोगस नोंदीला बसणार चाप 

सोलापूर - टाटा ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून आता घरबसल्या स्वत:च्या शेतातील पीकपेऱ्याची नोंद ठेवता येणार आहे. त्यामुळे कार्यालयात बसून पिकांच्या नोंदी घेण्याच्या तलाठ्यांच्या प्रवृत्तीला चाप बसणार आहे. 

शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात पीक पेऱ्याच्या नोंदीसाठी तलाठ्यांकडे हेलपाटे मारावे लागतात. बहुतांशी तलाठी शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून अथवा ऐकीव माहितीनुसार पिकांच्या नोंदी उताऱ्यावर लावतात. त्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणी नियोजनात त्रुटी निर्माण होत होत्या. या नव्या प्रणालीनुसार आता मात्र बोगस पीकपेऱ्याच्या नोंदीला चाप बसणार आहे. त्यामुळे सरकारला हमीभाव, पीक विमा आणि प्रत्येक पिकांच्या क्षेत्राची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. 

ऍपची वैशिष्ट्ये 
- स्मार्टफोनवर पीकपेऱ्याच्या नोंदीच्या स्वतंत्र ऍपची सोय 
- ऍपच्या माध्यमातून शेतकरी स्वत: पीक पेऱ्याची ठेऊ शकणार नोंद 
- शेतकरी करणार दर पंढरवडा, प्रत्येक महिनाअखेरीस पिकांचे फोटो ऍपवर लोड 
- प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील पाच तालुक्‍यांची निवड 

नवी प्रणाली लवकरच राज्यभर 
शेतकरी स्वत:च्या पीक पेऱ्यांची नोंद स्मार्टफोनवरील ऍपच्या माध्यमातून करु शकणार आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा येथील करंजपाडा, नागपूर जिल्ह्यातील दिंडोरी व कामठी, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि पुणे जिल्ह्यातील बारामती या तालुक्‍यांची निवड करण्यात आल्याचे राज्याच्या कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीक पेऱ्याच्या आधारे पुरेसे कर्ज मिळावे, शासनाला प्रत्येक पिकांखालील क्षेत्रानुसार नियोजन करता यावे, या उद्देशाने स्मार्टफोनवरील ऍप, ड्रोन आणि रिमोट सेसिंग अशा तीन प्रकारांची पडताळणी प्रायोगिक तत्त्वावर चाचणी केली जात आहे. त्यामधील स्मार्टफोनवरील ऍप सोयीचे आणि शेतकऱ्यांसाठी सुलभ असल्याचे दिसून येते. त्यामुळे ही पध्दत लवकरच राज्यभर लागू होण्याची शक्‍यता आहे. 
- विजय घावटे, विस्तार संचालक, कृषी विभाग  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com