नगर - पाथर्डीत मुसळधार पावसामुळे वृद्धाचा मृत्यू

राजेंद्र सावंत 
शनिवार, 23 जून 2018

पाथर्डी (नगर) : तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे मुखेकरवाडी (कोरडगाव) येथील किसन भानुदास माने (वय 63) हे शेतातच पावसात झोडपल्याने मृत झाले. कोरडगाव, मिरी भागात चांगला पाऊस झाला.

कोरडगाव परीसरातील बंधारे भरुन नद्यांना पाणी वाहीले. मिरी भागात हा दुसरा पाऊस पडल्याने कापुस लावणी व पेरणीला सुरुवात होईल. कोडगाव येथे 47 मिमी पाऊस झाला. पाथर्डी 19 मिमी, मिरी येथे 45 मिमी , माणिकदौंडी-5 मिमी, टाकळीमानुर -7 मिमी, करंजी-4 मिमी, पाऊस झाला.

कोरडगाव परिसरातील मुखेकर वाडी येथील किसन माने हे शेळ्या चारण्यासाळी शेतात गेले होते. सायकांळी सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. माने एका झाडाखाली उभे राहिले पावसाचे प्रमाण वाढले. माने जागीच पडले. तेथेच त्यांचा मृत्यु झाला. चरणाऱ्या शेळ्या गावात आल्या मग नागरीकांनी माने यांचा शोध सुरु केला. शेतात जाऊन पाहिले तर माने मृत झाल्याचे उघडकीस आले.माने यांच्यावर शनिवारी सकाळी मुखेकरवाडी येथे अत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: old man died because of heavy rain