मागण्या मान्य करा किंवा आम्हाला इच्छामरण द्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पंढरपूर - ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी वाळवा (जि. सांगली) येथील ज्येष्ठ नागरिकांनी आज (मंगळवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रे पाठवून केली. यावेळी या नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी, असे साकडेही विठ्ठलाला घातले. 

पंढरपूर - ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी वाळवा (जि. सांगली) येथील ज्येष्ठ नागरिकांनी आज (मंगळवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रे पाठवून केली. यावेळी या नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी, असे साकडेही विठ्ठलाला घातले. 

ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे करावी, श्रावणबाळ निवृत्तिवेतनात एक हजार रुपयांची वाढ करावी, स्वतंत्र आयुक्तालय निर्माण करावे, मोफत विमा योजना लागू करावी, दरमहा पाच हजार रुपये निवृत्तिवेतन सुरू करावे, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी वाळवा तालुक्‍यातील ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व ‘फेस्कॉम’च्या माध्यमातून शासनदरबारी प्रयत्न सुरू आहेत. वेळोवेळी निवेदने दिली आहेत; मात्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्‍नी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. खोटी आश्‍वासने दिली आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ४०० ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रे पाठवून मागण्या मान्य करण्याची मागणी केली. आज सकाळी वाळवा येथून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी येथील शिवाजी चौकातून टाळ-मृदंगाच्या गजरात नामदेव पायरीपर्यंत सरकारविरोधी दिंडी काढली. पायरीजवळ आल्यानंतर ‘आमच्या मागण्या मान्य करा; अन्यथा इच्छामरण्याची परवानगी द्या’ अशी मागणी करत सरकारविरोधी भजन आंदोलन केले. त्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी येथील टपाल पेट्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना मागण्यांची पत्रे पाठवली. 

हे झाले होते सहभागी...
या आंदोलनामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे, हणमंत पाटील, आर. ए. देसाई, उपाध्यक्ष अशोक गोडसे, आनंदराव पाटील, हंबीरराव पाटील, आर. वाय. पाटील, बी. डी. खोत, विष्णू शिनगो, अरुणा कलेदोनकर आदींसह ज्येष्ठ नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Old People passive euthanasia