बेळगाव - ओमिक्रॉनमुळे परिवहन महामंडळाला कोट्यवधींचा फटका

आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी मर्यादेमुळे मंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
परिवहन महामंडळ बेळगाव
परिवहन महामंडळ बेळगाव sakal
Summary

आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी मर्यादेमुळे मंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बेळगाव : कर्नाटकात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्यानं परिवहन महामंडळाची चिंताही वाढू लागली आहे. संसर्ग वाढल्यास परिवहन सेवा तसा गंभीर परिणाम जाणवणार आहे. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत दोन वेळा परिवहन सेवा खंडित झाली आहे. तर कोरोना नियमावलीमुळे सेवा सुरू होऊनही आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी मर्यादेमुळे मंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. (omicron effect on transportation)

कोरोना संसर्गामुळे मागील वर्षी २१ मार्च ते २९ मे परिवहन सेवा खंडित राहिली. तर कर्नाटकातून बेळगावमार्गे गोवा आणि महाराष्ट्रातील आंतरराज्य बससेवा ६ ऑक्टोबरपर्यंत बंद राहीली. यावर्षी परिवहन कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्यात झालेल्या संपामुळे ६ एप्रिल ते ३७ एप्रिलपर्यंत परिवहन सेवा खंडित होती. त्या पाठोपाठ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण मे महिना देखील परिवहन सेवा खंडित राहिली ६ जून रोजी ही सेवा सुरू झाली. पण ती केवळ कर्नाटकापूर्ती मर्यादित राहिली.

परिवहन महामंडळ बेळगाव
राष्ट्रवादी खासदारांविषयी सेना नेत्यांची नाराजी; महाआघाडीत बिघाडी?

आजही कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य सेवा बंदच आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेशासाठी लादलेल्या कोरोना चाचणी अहवालामुळे फेब्रुवारी २०२१ ते आतापर्यंत महाराष्ट्रातून एकही बस बेळगावात आलेली नाही. तर कर्नाटकातून महाराष्ट्रात रोज केवळ २ बसेस धावत आहेत. पण त्यालाही प्रवासी नाहीत. कोरोना संसर्गाचा फटका परिवहन महामंडळाला अधिक बसला आहे. परिवहनच्या बेळगाव विभागाचे रोजचे महसूल ७५ लाख रुपये आहे. पण मागील दोन वर्षापासून हे टार्गेट गाठणे परिवहन मंडळाला शक्य झालेले नाही.

लॉकडाउनच्या काळात जरी परिवहन सेवा बंद राहिली. तरी त्यानंतर देखील कोरोना नियमावलीमुळे परिवहनच्या बसेसमध्ये केवळ ५० टक्के आसनक्षमता भरण्याची मुभा शासनाकडून देण्यात आली होती. त्यामुळे सेवा जरी सुरू असली तरी प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता आला नाही. आता ओमीक्रॉनचा संसर्ग वाढू लागला असल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होईल का? अशी भीती सर्वांनाच आहे. जरी झाले नाही तरी, नियम मात्र कठोर केले जाणार आहेत. त्यामुळे कोरोना नियमावलीचा विचार केल्यास पुन्हा एकदा परिवहनच्या बसेस मध्ये ५० टक्के आसन क्षमतेचा नियम लागू होऊ शकतो. त्यामुळे मंडळाला आता ओमीक्रॉनची भीती भेडसावू लागली आहे.

परिवहन महामंडळ बेळगाव
पुण्यात ओमिक्रॉन विषाणूचा धोका वाढला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com