दीड लाख क्वॉरंटाइन, साडेआठशे स्वॅब, २६ बाधित...तरीही नगरने ही किमया केली

One and a half million quarantines, one thousand swabs, disrupted service ... Ahmadnagar defeated Corona
One and a half million quarantines, one thousand swabs, disrupted service ... Ahmadnagar defeated Corona

नगर ः काेराेनाने सर्व जगात थैमान घातले आहे. भारतात महाराष्ट्रातही बाधितांची आकडेवारी मोठी आहे. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मुंबई आणि पुण्यातील स्थितीही गंभीर बनते आहे. त्या खालोखाल नगर जिल्ह्यात कोरोना बाधित आहेत. महाराष्ट्रात इतर शहरांमध्येही बाधितांची संख्या वाढते आहे. बहुतांशी ठिकाणी बाधितांचा मृत्यू झाला आहे. परंतु नगर याला अपवाद आहे.

 जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आराेग्य, पाेलिस व महसूलच्या अधिकार्यांकडून पाऊले टाकली आहेत. जिल्ह्यात काेराेनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या अाज जरी 26 दिसत असली तरी त्यामध्ये एक पुण्यात तर दुसरा बीड जिल्ह्यातील आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात फक्त 21जण उपचार घेत आहेत. त्यांना ठणठणीत करण्यासाठी अाराेग्य यंत्रणा जीवाचे रान करीत अाहेत. त्यांच्या अहोरात्र प्रयत्नांमुळे दोन रूग्णांना डिस्चार्जही मिळाला आहे. 

काेराेना विषाणूने चीनमध्ये थैमान घातले. तेथे एकामागून एक रुग्ण सापडत हाेते. सुपा एमअायडीतील नाेकरीस असलेला एक बाबुर्डी बेनमधील तरुण चीनवरून जानेवारी महिन्यात भारतात अाला. त्यानंतर त्याने खबरादारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यास सुरवात केली. त्यानंतर आराेग्य विभागाने ताे कर्मचारी ज्या कंपनीत कामास आहे,त्या कंपनीत जाऊन चीनवरून आलेल्या सर्व रुग्णांची विचारपूस करून त्यांची तपासणी केली. तेव्हापासून आजपर्यंत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालालय, उपजिल्हा रुग्णालय, 23 ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषदेचे 96 प्राथमिक आराेग्य केंद्र, 555 उपकेंद्रातील कर्मचारी काेराेना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अहाेरात्र कार्यरत आहेत.

या आराेग्य यंत्रणेला आता आशा कर्मचारी व अंगणवाडी सेविकेसह पाेलिस व महसूल, ग्रामसेवक धावलेले आहे. सध्या सर्वत्र लाॅक डाऊन आहे. त्या अगाेदर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांमध्ये नाेकरीस असलेल्या अनेकजण गावाकडे आले आहेत.

या सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन सुमारे एक लाख 54 हजार लाेकांना हाेमकाॅरंटाईन केलेले आहे. जिल्ह्यात आजअखेरपर्यंत 854 जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले. त्यामध्ये 26 जण काेराेनाची बाधा झालेले स्पष्ट झाले. त्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील एक व बीड जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. श्रीरामपूरमधील एकावर पुण्यात उपचार सुरू आहे.

दाेन जण जिल्हा रुग्णालयात बरे हाेऊन त्यांना घरी साेडण्यात आले. सध्या जिल्ह्यात फक्त 21 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 201 जण काेराेना बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तसेच काेराेना बाधीतांच्याच संपर्कात आहेत. मात्र त्यांना कुठलीच लागण न झालेले एकूण 549 जण हाेम काॅरन्टाईन केले आहेत.

ते नगरमुळेच उघडकीस आले

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आराेग्य, पाेलिस, महसूल आदी यंत्रणा कार्यरत आहे. याेग्य नियाेजन कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी व अाराेग्य यंत्रणेच्या मेहनतीमुळे काेराेनाबाधीत रुग्ण बरे हाेऊन घरी जात आहे. ही उल्लेखनीय बाबीुळे राज्यात नगरची कामगिरी उल्लेखनिय ठरत आहे. बूथ हॉस्पीटलमधील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही ही मेहनत आहे. तबलिगी जमातच्या लोकांना संसर्ग झाल्याची माहिती नगरमधून उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेश सरकारला कळवले. तेव्हा त्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. बाधित व्यक्ती आढळल्यानंतर लगेच तिच्या संपर्कातील लोकांना तपासणीसाठी आणले जाते. किंवा इतरांचीही काळजी घेतली जाते. बीडचा पहिल्या रूग्णालाही बाधा झाली आहे. त्यालाही तेथे जाऊन शोधून आणल्यानेच इतरांना संसर्ग होण्याचा धोका टळला.

घराेघरी जाऊन मारले शिक्के
बाहेरील जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात आलेल्या सुमारे एक लाख 54 हजार जणांच्या हातावर घराेघरी जाऊन शिक्के मारण्याचे कामही आराेग्य विभागाकडून करण्यात आले.

लक्षणे वाटल्यास संपर्क साधा
काेराेनाची काही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकार्यांसह आराेग्य यंत्रणेकडून केले जात आहे. त्याला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आराेग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com