esakal | टेन्शन घ्यायचं नाही... पोस्टमन घरपोहोच देईल पेन्शन

बोलून बातमी शोधा

Don't want tension ... Postman will pay home pension

ज्या व्यक्तींना ठराविक ठिकाणी औषधे पाठवायचे आहेत. त्यांनी विभागीय कार्यालयास ०२४१-२३५५०१० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

टेन्शन घ्यायचं नाही... पोस्टमन घरपोहोच देईल पेन्शन
sakal_logo
By
अमित आवारी

नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण भारतभर संचारबंदी लागू केली आहे. अशा परिस्थितीत अहमदनगर विभागातील अत्यंत वयस्कर पेन्शनर तसेच अपंग पेन्शनर यांच्यासाठी घरपोच पेन्शन देण्याची सुविधा अहमदनगर डाक विभागाद्वारे करण्यात आलेली आहे.

या पेन्शन धारकांनी त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा किंवा विभागीय कार्यालयास ०२४१-२३५५०१० तसेच प्रधान डाकघरास ०२४१-२३५५०३६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

हेही वाचा - ते पुढे सरसावले नि मजुरांच्या घरी चूल पेटली

विभागातील खेडोपाड्यामध्ये जे विविध राष्ट्रीयकृत बँकाचे ग्राहक आहेत व ज्यांचे खाते आधार संलग्न आहे त्यांना देखील लॉकडाउन परिस्थितीमुळे त्यांचे बँक खात्यातील पैसे काढण्यास अडचण निर्माण होत आहे. परंतु अशा ग्राहकांना देखील तेथील पोस्टमन मार्फत एका वेळेस दहा हजार रुपयांपर्यन्त “आधार संलग्न भुगतान प्रणाली" (AePS) दवारे पैसे देण्याची व्यवस्था केली आहे.

बँकेच्या ग्राहकांना देखील अशी सुविधा पोस्टमन मार्फत घरपोच मिळाल्याने त्यांना घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही. तरी बँकेच्या ज्या ग्राहकांना त्यांचे पैसे काढण्यात अडचण येत आहे. त्यांनी आपल्या भागातील पोस्टमन ग्रामीण डाक सेवक यांच्याशी संपर्क साधावा.

सध्याच्या काळात वाहतुकीची सर्व साधने बंद असल्याने कोणत्याही वस्तूची ने-आण करणे अशक्य झाले आहे. परंतु अशा परिस्थितीत आजारी व्यक्तिपर्यंत औषधे पोहोचविणे हे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी पोस्ट खात्याने ठराविक ठिकाणी विशेष व्यवस्था केली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना ठराविक ठिकाणी औषधे पाठवायचे आहेत. त्यांनी विभागीय कार्यालयास ०२४१-२३५५०१० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोस्ट अधीक्षक जे. टी. भोसले यांनी केले आहे.