सेवा निवृत्त बॅंक अधिकाऱ्याला गंडा; दिल्लीतून भामट्यास अटक 

सेवा निवृत्त बॅंक अधिकाऱ्याला गंडा; दिल्लीतून भामट्यास अटक 

कोल्हापूर - व्यवसायासाठी 8 कोटी 40 लाखांचे कर्ज मिळून देण्याच्या अमिषाने सेवा निवृत्त बॅंक अधिकाऱ्याला 22 लाखांहून अधिकचा गंडा घातल्या प्रकरणी संशयितास लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिल्लीतून आज अटक केली. अजय गंगादास दास (वय 22, सध्या रा. दिल्ली, मूळ रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, गजानन भोसले (वय 63, रा. संभाजीनगर) हे प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना व्यवसायासाठी कर्जाची आवश्‍यक होती. जाहीरात वाचून त्यांनी सौभाग्य फायनान्स कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यांना गोरख शर्मा नावाच्या भामट्याने प्रकल्प अहवाल पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना 8 कोटी 40 लाखांचे कर्ज मंजूरीचे पत्र दिले. पण या कर्जासाठी विविध प्रकाचे शुल्क म्हणून 13 डिसेंबर 2017 ते 2 जुलै 2018 याकाळात त्यांच्याकडून 22 लाख 37 हजार 980 रूपये उखळले. पैसे देऊनही कर्ज मंजूर होत नसल्याने भोसले यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिसात दिली होती. 

दरम्यान, गुन्ह्यातील संशयितांना दिल्लीत जावून शोधण्यासाठी प्रवास खर्च म्हणून भोसले यांच्याकडे 25 हजाराची मागणी करण्यात आली होती. याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाने रचलेल्या सापळ्यात संशयित हेडकॉन्स्टेबल अजिज शेख व चहा टपरीचालक दाऊद पाटणकर हे 24 जूनला जाळ्यात अडकले होते.

चार दिवसापूर्वी पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी एक पथक दिल्लीला पाठवले. त्यांनी याप्रकरणातील संशयित अजय दास याला ताब्यात घेऊन आज रात्री अटक केली. प्राथमिक तपासात त्याचे शिक्षण केवळ तिसरी पर्यंत झाले असून तो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याची माहिती पुढे आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com