कराडमध्ये पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

कऱ्हाड येथील बसस्थानक परिसरात पिस्तूल घेवून फिरणाऱ्या संशयीतास काल रात्री उशिरा अटक झाली. सागर सदाशिव नलावडे (वय 20, रा. देशमुखमळा, पार्ले ता. कऱ्हाड) असे संबधित युवकाचे नाव आहे.
 

कऱ्हाड- येथील बसस्थानक परिसरात पिस्तूल घेवून फिरणाऱ्या संशयीतास काल रात्री उशिरा अटक झाली. सागर सदाशिव नलावडे (वय 20, रा. देशमुखमळा, पार्ले ता. कऱ्हाड) असे संबधित युवकाचे नाव आहे.

सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने काल रात्री उशिरा कारवाई केली. पोलिसांनी सांगितले की, परिसरात युवक पिस्तूल घेऊन फिरत होता. त्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्यांनी बस स्थानक परिसरात सापळा रचला. त्यावेळी, गस्त घालणाऱ्या पोलिसांना एक युवक संशयीतरित्या फिरताना दिसला. त्याच्याकडे पथकाने चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली त्यावेळी त्याच्याकडे पिस्तूल सापडले.

पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत त्याने आपली ओळख सांगून सागर नलावडे असे नाव असल्याचे सांगितले. संशयिताला कऱ्हाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: One arrested with a pistol in Karad