यंदा सर्वच कारखान्यांना ऊस गाळपासाठी ऊस कमी पडण्याची शक्यता आहे. गळीत हंगाम (Sugarcane Season) सुरू करताना ठेवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न होत आहे.
चिक्कोडी : जिल्ह्यात सरकारने २८ साखर कारखान्यांची (Sugar Factories) गतवर्षीच्या हंगामातील गाळप व साखर उताऱ्यावर एफआरपी जाहीर केली होती. त्यानंतर काही कारखाने अधिक सुरू आहेत. सध्या ३० कारखान्यांकडून जिल्ह्यात गाळप सुरू आहे. या कारखान्यांकडून एक कोटीहून अधिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.