ट्रकच्या धडकेत चिमुरडी ठार तर मारहाणीत चालकाचाही मृत्यू

ट्रकच्या धडकेत चिमुरडी ठार तर मारहाणीत चालकाचाही मृत्यू

सांगली - येथील हरिपूर रस्त्यावर दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. त्यात सहावर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऋचा सुशांत धेंडे, असे त्या चिमुरडीचे नाव आहे.
दरम्यान, चिमुरडीच्या मृत्यूनंतर परिसरातील नागरिकांनी ट्रकचालकास बेदम मारहाण केली. त्यात ट्रकचालक कुमार श्रीकांत आळगेकर (वय ४५ रा. हरिपूर) याचाही मृत्यू झाला. संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेकही केली.

येथील हरिपूर रस्त्यावर काळी वाट परिसरात काका आणि पुतणी जेवण करून घरी निघाले होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक (एमएच ०४ ईबी ०३५७) ने जोराची धडक दिली. त्यात दुचाकीला जोराची धडक बसून ऋचा रस्त्यावर आदळली. यावेळी तिच्या डोक्‍याला जोराचा मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.

त्यानंतर परिसरातील जमावाने ट्रकचालकास बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. मृत्यूनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेला. त्यावेळी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com