इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावर अपघातामध्ये एक ठार

इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावर अपघातामध्ये एक ठार

इस्लामपूर -  इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावरील प्रतिक पेट्रोल पंपासमोर भरधाव टँकरची मोटरसायकला धडक बसली. या अपघातामध्ये कुरळप पोलिस ठाण्याचे हवालदार अजय सुतार (वय. ५१, रा. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सकाळी ११ वाजण्याचा सुमारास झाला. 

अजय सुतार हे कुरळप पोलीस ठाण्यात नोकरीस आहेत .ते मुलाच्या शिक्षणासाठी इस्लामपूर येथे राहत होते. आज सकाळी अकाराच्या सुमारास सुतार हे ड्युटीसाठी इस्लामपूरहून कुरळपला चालले होते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते बाहेर पडत असताना वाघवाडीकडे चाललेल्या भरधाव टँकरची त्यांच्या मोटरसायकलला धडक बसली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com