ऊस ट्रॅक्टरच्या धडकेत मलकापुरचा एकजण ठार

ऊस ट्रॅक्टरच्या धडकेत मलकापुरचा एकजण ठार

वांगी - वांगी (ता. कडेगांव ) जवळ कडेपूरकडून ऊस भरुन भरधाव वेगाने चाललेल्या ट्रॅंक्‍टरची मोटारसायकलला धडक बसली. काल रात्री झालेल्या या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दादासो बळवंत जगदाळे ( वय 68 रा. मलकापुर, ता. कराड ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

चिंचणी-वांगी पोलीसांतून मिळालेली अधिक माहिती अशी कि, मलकापूर येथील दादासो बळवंत जगदाळे यांची शेळकबाव ( ता. कडेगांव ) येथे शेती आहे. सोमवारी रात्री 8 च्या दरम्यान ते शेतातील कामे आवरून शेळकबाव येथून वांगीमार्गे दुचाकीवरुन ( एम. एच 09 टी 8524 )  मलकापुरकडे निघाले होते.  दरम्यान शंकर ज्ञानु पाटील रा. पुंणदी ( ता. पलुस ) यांच्या मालकीचा ट्रॅक्टर  ( एम. एच.11 जी.1306 )  हा कडेपुरकडून ऊस घेऊन चालला होता. वांगीच्या उत्तरेस जून्या सांगली-सातारा रस्त्यावर ट्रॅंक्‍टरची दुचाकीला धडक बसली. धडकेनंतर जगदाळे खाली पडले. त्यांच्या अंगावरून ऊसाने भरलेल्या ट्राॅल्या गेल्याने ते जागीच ठार झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com