
सांगली :माधवनगर येथील जकात नाका येथे भरधाव दुचाकीने चारचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला. ऋषिकेश विजय कांबळे (वय २२, वज्रचौंडे, ता. तासगाव) असे मृताचे नाव आहे. दुचाकीमागे बसलेला सूरज बनसोडे गंभीर जखमी झाला आहे.