मोहोळ- भरधाव कारने मोटारसायकलस्वारास उडविले एक ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

मोहोळ : सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने मोटार सायकलस्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ता. २६ रोजी मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकात घडली.

मोहोळ : सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने मोटार सायकलस्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ता. २६ रोजी मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकात घडली.

याबाबत मोहोळ पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार बाळासाहेब प्रभाकर शिंदे रा .ओंढी , राजेंद्र श्रीधर भोसले रा. खवणी वय ४०, हे दोघे मामा भाचे  एमएच १३ सीझेड ०९३२ या मोटारसायकल वरून कन्या प्रशाला चौकातुन रस्ता ओंलाडत  असताना सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारने मोटारसायकला जोराची धडक दिली त्यामध्ये राजेंद्र श्रीधर भोसले व बाळासाहेब प्रभाकर शिंदे हे गंभीर जखमी झाले होते .जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर उपचारापुर्वीच राजेंद्र श्रीधर भोसले यांचा मृत्यु झाला. या अपघाताप्रकरणी पळून गेलेला कारचालक देवदत्त तोयनाथ पंथ वय २७, रा. भांडुप वेस्टर्न मुंबई यास पोलीसांनी गाडीसह ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पो.हे .कॉ  अविनाश शिंदे करीत आहे.

मयत राजेंद्र श्रीधर भोसले हा अतिशय गरीब कुंटुंबातील असुन यास ३ मुली व १ मुलगा आहे. इयत्ता ४ थी मध्ये शिकत असलेली त्याची एक मुलगी सोलापूरातील एका रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची उसनवारीने जुळवाजुळव करण्यासाठी ते गावाकडे निघाले होते. तत्पुर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: one death in an accident near mohol