सोलापुरजवळ गोळीबारात दरोडेखोर ठार; 2 पोलिस जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

रात्र गस्तीवेळी संशयास्पद अवस्थेत दिसल्यानंतर दरोडेखोरांना पोलिस पथकाने हटकले. दरोडेखोरांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणात केलेल्या गोळीबारात एका दरोडेखोराचा मृत्यू झाला आहे. या घटनेची अधिक तपास चालू आहे.
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक

सोलापूर : रात्र गस्तीवेळी दरोडेखोरांना हटकल्यानंतर जोरदार चकमक झाली. दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला. बचावासाठी केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला. ही घटना रविवारी पहाटे सोलापूरजवळील उळेगाव परिसरात घडली.

रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास शहराजवळील उळे गावाजवळ पोलिस गस्त घालत होते. पोलिसांना पाच ते सहा दरोडेखोर दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले. त्यानंतर एका दरोडेखोरला पकडण्यात आले. त्याला वाहनात बसवत असताना 'साहेब चुकले चुकले म्हणत' दरोडेखोराने हातातील तलवारीने तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला. त्यामध्ये पोलिस निरिक्षक पाटील हे गंभीर जखमी झाले. बचावाच्या उद्देशाने पोलिस निरिक्षक पाटील यांनी त्याच्यावर गोळीबार केला. दरोडेखोर गोळीबारामध्ये जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

उळेगावात पोलीस आणि दरोडेखोरात झालेल्या या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. 

रात्र गस्तीवेळी संशयास्पद अवस्थेत दिसल्यानंतर दरोडेखोरांना पोलिस पथकाने हटकले. दरोडेखोरांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणात केलेल्या गोळीबारात एका दरोडेखोराचा मृत्यू झाला आहे. या घटनेची अधिक तपास चालू आहे.
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक

Web Title: one decoit killed on police firing near Solapur