रत्नदीप मेडिकल फौंडेशनमध्ये १०० खाटांचा विलगीकरण कक्ष

वसंत सानप
गुरुवार, 9 एप्रिल 2020

होमिओपॅथिक, फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे गट तयार करुन त्यांच्या मार्फत आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याची हमी दिली. विलगीकरण कक्षातील व्यक्तींसह येथील कर्मचारी, भेटी देणाऱ्या अधिकार्यांना संस्थेमार्फत विनामोबदला सकाळी नाश्ता,
दोन वेळेचे जेवण ,चहा या सेवा उपलब्ध करून देण्याची ग्वाही डॉ. भास्कर मोरे यांनी दिल्याचे, तहसीलदार नाईकवाडे यांनी सांगितले.

जामखेड: जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन जामखेड ग्रामीण आरोग्य प्रकल्प पाठोपाठ 100 रुग्णांची व्यवस्था होऊ शकेल. अशा दुसऱ्या विलीगीकरण कक्षाची व्यवस्था येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेच्या होमिओपॅथिक, फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयाच्या  शैक्षणिक संकुलात केली आल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.

हेही वाचा - निघोजच्या त्या व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह

जामखेड ग्रामीण रुग्णालयात 75 रुग्णांना विलगीकरणासाठी ठेवण्याची व्यवस्था होती. सध्या 65 रुग्णांना येथे ठेवण्यात आले आहे. अधिकच्या व्यक्तींना विलगीकरणासाठी ठेवण्याची वेळ आली तर स्वतंत्र व्यवस्था असायला हवी म्हणून तहसीलदार विशाल नाईकवाडे व ग्रामीण रुग्णालय जामखेडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेच्या होमिओपॅथिक, फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयाच्या  शैक्षणिक संकुलाची पहाणी करून सदर संकुलातील आवश्यक इमारत कोरोना विलगीकरण कक्षासाठी उपलब्ध करून देण्याबाबत संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे व सचिव डॉ. वर्षा मोरे यांना विनंती केली.

डॉ. मोरे दामपत्यांना सामाजिक बांधिलकी जपली. आपल्या होमिओपॅथिक महाविद्यालयाची इमारत व हॉस्पिटल कोरोना विलगीकरण कक्षासाठी उपलब्ध दिली करून दिली. एवढेच नाही तर होमिओपॅथिक, फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे गट तयार करुन त्यांच्या मार्फत आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याची हमी दिली. विलगीकरण कक्षातील व्यक्तींसह येथील कर्मचारी, भेटी देणाऱ्या अधिकार्यांना संस्थेमार्फत विनामोबदला सकाळी नाश्ता,
दोन वेळेचे जेवण ,चहा या सेवा उपलब्ध करून देण्याची ग्वाही डॉ. भास्कर मोरे यांनी दिल्याचे, तहसीलदार नाईकवाडे यांनी सांगितले.

 

यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित अधिकारी,आरोग्य कर्मचारी यांना एन 95 मास्क, सॅनिटायजर व पीपीई कीट चे वाटप करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hundred bed separation room at Ratnadip Medical Foundation