कारच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार, एक गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

कवठे - पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कवठे (ता. वाई) हद्दीत राज हॉटेलसमोर वॅगन आर कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात झाला. यामध्ये एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहीतीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. वॅगन आर कारने हिरो होंडा स्पेलंडरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेले सचिन वामन शिंदे (वय 38) रा. अनवडी (ता. वाई) हे महामार्गावरुन सेवारस्त्यावर जोरदार आपटून डोक्याला मार लागून जागीच ठार झाले. तर दुचाकी चालक सचिन संपत बाबर (वय 30) रा. जांब (ता. वाई) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, महामार्गावरुन वॅगन आर कारने दुचाकीला सेवारस्त्यावर जवळपास 100 फूट अंतरापर्यंत फरफटत नेले.

Web Title: One killed, one seriously injured in a car accident