राहुरीमध्ये वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

राहुरी - राहुरी येथे काल (मंगळवारी) रात्री दहा वाजता, नगर-मनमाड महामार्ग ओलांडताना एक ते दीड वर्षाच्या नर बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने, बिबट्या जागीच ठार झाला. पल्लवी हॉटेल समोर ही घटना घडली.

या भागात महामार्गाच्या दुतर्फा ऊस शेती आहे. उसाच्या फडातून बिबट्या रस्ता ओलांडून जात होता. रात्रीच्या अंधारात भरधाव मालट्रकने बिबट्याला जोरदार धडक दिली असावी. असा अंदाज आहे. बिबट्याच्या तोंडाला जबर मार लागला आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे यांनी सर्वप्रथम घटना पाहिली. त्यांनी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना माहिती दिली. पोलिस पथकासह वनखात्याचे अधिकारी गोरक्षनाथ लोंढे, वामनराव लांबे, सचिन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत बिबट्याला डिग्रस येथील वनखात्याच्या रोपवाटिकेत हलविण्यात आले आहे. तेथे आज (बुधवारी) बिबट्याची शवविच्छेदन करण्यात आले.

Web Title: one leopard dead in rahuri