इस्लामपूरात आणखी एका महिलेला कोरोनाची लागण...

one more corona patient in sangli
one more corona patient in sangli

इस्लामपूर (सांगली) : शहरात मुंबईतील साकिनाका येथून आलेल्या 33 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल आज रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आहे.

तिचे पती मुंबई येथे नोकरी करतात. पती, पत्नी व मुलगा असे तिघे जण मुंबईहून इस्लामपुरात आल्यानंतर कामेरी रस्त्यावरील दत्त टेकडी परिसरातील त्यांच्या नातलगांच्या घरात राहात होते.

काल त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर तिघांनाही समाजकल्याण विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केले होते. कालच स्वब तपासणीसाठी घेतले होते. आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com