सीमाप्रश्नी मराठी जनता रस्त्यावर

One November Black Day in Maharashtra Karnataka Border Villages
One November Black Day in Maharashtra Karnataka Border Villages

बेळगाव - बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात अन्यायाने डांबल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज काळा दिन पाळण्यात आला. भव्य मूक फेरी काढण्यात आली.

महाराष्ट्रात जाण्याच्या जिद्दीचे दर्शन घडवत हजारो मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले. धर्मवीर संभाजी उद्यानापासून फेरीला सुरवात झाली आहे. दंडाला, डोक्याला काळ्या फिती बांधून आबालवृद्ध काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाले आहेत. 

युवकांसह अनेकजण काळे कपडे परिधान करून फेरीत सहभागी झाले आहेत. ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘रहेंगे तो महाराष्ट्राने नही तो जेल मे’ अशी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मागणीचे आणि निषेधाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. पन्नास हजारांहून अधिक मराठी भाषिक न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगावात मराठी भाषिकांची ताकत दिसून आली. शहराच्या विविध भागातून फेरी काढण्यात आली. 

कंग्राळी खुर्द येथे बंद पाळून निषेध

एक नोव्हेंबर हा सीमा भागात काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. निषेध म्हणून कंग्राळी खुर्द गावातील नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला. तसेच गावातील पुरूष व माहिलांनी मुक मोर्चामध्ये सहभाग घेतला.

१९५६ पासून प्रत्येकवर्षी काळा दिन पाळण्यात येतो.  केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येतात. आजही गावातील प्रत्येक मराठी माणसाला एक ना एक दिवस आपण महाराष्ट्रात जाऊ, अशी पक्की धारणा आहे. त्यामुळे सीमा लढयाच्या प्रत्येक चळवळीत या गावचे नागरीक स्वइच्छेने सहभागी होतात. गावातील सर्व दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक बंद पाळून निषेध व्यक्त करतात. काळे टी शर्ट, काळ्या साडया, काळ्या पट्टया बांधून शहरातील फेरीत नागरिक सहभागी होतात..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com